कार्यालयीन वेळ : सोम. ते शुक्र. स.९.४५ वा. ते संध्या ६.१५ वा.

जिल्हा परिषद जळगाव

सकारात्मक पाऊल : जि.प.च्या ६५ शाळा करणार रेनवॉटर हार्वेस्टिंग

जळगाव लाईव्ह न्यूज । ११ एप्रिल २०२२ । भुसावळ तालुक्यातील जिल्हा परिषद शाळांनी रेनवॉटर हार्वेस्टिंग करायला पुढाकार घेतला आहे. तालुक्यातील १८ शाळांमध्ये रेनवाॅटर हार्वेस्टिंगची कामे करण्यात आली आहेत. यामुळे शाळेच्या छतावर पडणारे पाणी थेट जमीनीत मुरवले जाईल. इतर ४७ शाळांमध्ये ही कामे सुरू आहेत.भूगर्भातील पाणी पातळी दिवसेंदिवस खालावत आहे. त्यामुळे पावसाचे जास्तीत जास्त पाणी जमिनीत जिरवणे गरजेचे आहे. त्यासाठी वेगवेगळ्या उपाययोजना केल्या जातात. त्याचाच एक भाग म्हणून शाळा स्तरावर रेन वॉटर हार्वेस्टिंगचा उपक्रम राबवला जातो. आतापर्यंत १८ शाळांमध्ये कामे पूर्ण झाली. अाचेगाव, तळवेल, पिप्रींसेकम, साकरी, चाेरवड, खडके, कुऱ्हापानाचे, मांडवेदिगर, वराडसीम, बेलव्हाय, जाेगलखेडा, सुनसगाव, काहूरखेडा, टहाकळी, गाेजाेरे, कंडारी अशी ही गावे आहेत.

Previous जि.प. मुख्याधिकाऱ्यांचा भन्नाट फंडा, सेवानिवृत्तीच्या दिवशीच पेन्शन देण्याचे आदेश
कार्यालयीन पत्ता:

जिल्हा परिषद, शिवाजी नगर रेल्वे पुलाजवळ, जळगांव-425001, महाराष्ट्र [MS], भारत

कार्यालयीन वेळ:

सोम. ते शुक्र. स.९.४५ वा. ते संध्या ६.१५ वा.

इ-मेल:
© 2022 ZP Jalgaon. All rights reserved @ Zilha Parishad,Jalgaon.| Designed & Developed by IT Cell, Zilha Parishad,Jalgaon

Proper View - Screen Resolution must be 1024 x 786 in pixel size.